Monday, 4 January 2021

हार्मोन्स संतुलित राखणाऱ्या 4 सोप्या टिप्स .. # 4 EASY TIPS FOR HORMONAL BALANCE

नमस्कार वैवी फुड्स  म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण ( लाडू सम्राज्ञी ) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण  या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय  खाद्य संस्कृतीचे महत्त्व  व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.




आजकाल अनेक महिलांना (Hormonal Imbalance) हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे.वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं. पौगंडावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, मॅनोपॉज अशा अनेक अवस्था महिलांच्या आयुष्यात येत असतात. या अवस्था पार पडल्यावर हॉर्मोन्स पुन्हा नैसर्गिकरित्या नियंत्रित होत असतात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक महिलांना हॉर्मोनल इमबॅलेंस या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, काही विशिष्ठ आजार ही यामागची कारणे असू शकतात.

जोपर्यंत आपण आपल्या हार्मोन्स ला त्रास देत नाही तोपर्यंत ते NATURAL RYTHM FOLLOW करतात आणि ते OFF TRACK जात नाही. तुम्हाला पीसीओडी थायरॉइडचा त्रास होतोय तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी..


  1. व्यायाम :-



व्यायामाचे फायदे

    • वजन नियंत्रित राहण्यास मदत
    • शारीरिक क्षमते मध्ये वाढ
    • नैराश्याचे प्रमाण कमी होणे
    • उत्साह वाढणे
    • शरीर पिळदार होणे
    • रोग प्रतिकार क्षमता वाढते
    • स्नायू मजबूत होतात.


व्यायाम करणे हे शरीरासाठीखूप गरजेचे आहे. दैनंदिन वेळेतील निदान 30 Minutes तरी तुम्हाला व्यायामासाठी दिली पाहिजे ज्यामुळे तुमचं रक्ताभिसरण चांगले राहते आणि ऑक्सिजनचा पुरवठाही योग्य प्रमाणात राखला जातो. एक्सरसाइज करणे खूप महत्त्वाचे आहे घरी राहून सूर्यनमस्कार, स्त्रेचींग करणे  प्राणायाम करणे यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते.



2.वामकुक्षी :



होय तुम्ही बरोबर वाचताय दुपारच्या जेवणानंतर किमान पंचवीस ते तीस मिनिटे तरी तुम्ही झोप घेतली पाहिजे जर तुम्हाला THYRIOD त्रास होत असेल तर जेवणानंतर तुम्ही जर ते पंचवीस मिनिटात झोप घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होईल.  जर तुम्ही तुमचे गुडघे जवळ घेऊन झोपला तर अन्न पचनासाठी मदत होईल तसेच HARMONS RYTHM ही चांगला राखला जाईल.

 


3.  छोटी  भुक :


https://www.facebook.com/vaivi.foods


आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दुपारच्या जेवणाचा डब्बा पौष्टिक मिळेल  पण सकाळी व संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या भुकेचं काय? तर त्यावेळी  जंकफूड न खाता  आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे बनवले जाणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जसे की पौष्टिक लाडू, कण्या .नंतर   फूड खाल्ल्यावर येणारे जडत्व व सकस  आहारानंतरचा उत्साह यात तुम्हाला  नक्कीच फरक जाणवेल.



 4.मोबाईलचा अतिवापर (Mobile Addiction ) :



तुम्ही किती वाजता झोपता किती वाजता उठता यावरही तुमचे दिवसाचे शेडूल ठरलेले असते असेच तुमचे आरोग्य ही वेळ नियंत्रित करत असते त्यामुळे झोपण्याच्या किमान एक तास आधी तरी तुम्ही मोबाईल   पाहणे टाळा. Technology ही माणसासाठी आहे माणूस टेक्नॉलॉजी साठी नाही.


आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान पन्नास हजार कुटुंबांना आम्ही पारंपारिक  भारतीय खाद्य  पदार्थांच्या( जसे लाडू , जात्यावर दळलेल्या कन्या ) माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.


तसेच आपण यापुढील ब्लॉग मध्ये भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेणार आहोत. भारतीय खाद्य संस्कृती मध्ये छोट्या भुकेसाठी तसेच न्याहारीसाठी खूप सारे ऑप्शनस आहेत त्यांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन  आलोआहोत. चला तर मग सुदृढ भारत या  मिशनमध्ये सहभागी  होताय ना ? 


ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.



https://www.facebook.com/vaivi.foods


https://www.instagram.com/vaivifoods/


https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ




भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...