Sunday, 28 March 2021

आल्हाददायक उन्हाळा # Healthy Summer

नमस्कार वैवी फुड्स म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण(लाडू सम्राज्ञी) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.




तुम्हाला माहिती आहे का खरं तर उन्हाळा हा ऋतू मधील बेस्ट मानला जातो कारण उन्हाळ्यात बरेच आपलं प्लॅनिंग असतं. स्त्रियांच्या जवळचा विषय म्हटला की वाळवण करायची.जेणे करून वर्षभर साठवून ठेवलेले पापड लोणचे इत्यादी प्रकार थंडीत आणि पावसाळ्यात उपयोगी पडतात. पण हे सर्व करत असताना आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतो का.आणि ती या उन्हाळ्यात कशाप्रकारे घ्यावीत की जेणेकरून आपले रोगप्रतिकारशक्‍ती टिकून ठेवण्यास आपल्याला मदत करेल. तसेच आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते.





उन्हाळा म्हटले की आपण चिडचिड होतो कारण उन्हाळ्यात आलेला घाम हा आपल्याला नकोसा वाटत असतो. ह्या उन्हाळ्यात होणारा त्रास म्हणजेच डोकेदुखी, पित्ता, पायाची डोळ्यांची जळजळ, जेवण न जाणं यामुळे आपल्याला अशक्तपणा ही येऊ शकतो म्हणून यासाठी आपल्याला उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जसे ऋतू बदलतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आहारात बदल करणं खूप गरजेचा आहे. जसे पावसाळा हिवाळा तसेच उन्हाळ्याचा मनापासून स्वीकार करणं खूप चांगलं. कारण हे नैसर्गिक आहे.जर आपण उन्हाळ्यात आपल्या आहारात बदल केला तर नक्कीच आपल्याला ह्या उन्हाळ्याचा त्रास खूप कमी प्रकारे जाणवेल. तर या उन्हाळ्यात आपण कशाप्रकारे आहार घेऊ शकतो ?असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.




उन्हाळ्यात बरीच प्रकारची फळे बाजारात येतात ती अवश्य खावी. जसे ताडगोळे कलिंगड टरबूज द्राक्ष स्ट्रॉबेरी अंजीर अशा फळांचा समावेश आपल्या आहारात करावा. त्याच बरोबर आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारची आंबिल म्हणजेच पेज बनवावी. जसे नाचणी आहे ज्वारी आहे मूग आहेत मिक्स धान्य जसे सत्तू आहे. इथे तुम्ही हातसडीच्या तांदळाची पेज बनवून घेऊ शकता. ही पेज बनवताना तुम्ही जर नाचणी पंचवीस ते तीस तास भिजत घालायची अधून मधून त्याचं पाणी बदलायचं नंतर त्याला एका कपड्यात बांधून चांगले मोड येईपर्यंत ठेवायचे आणि नंतर त्याला चुकून त्याची पावडर बनवून घ्यायची आणि ह्या पावडरीची आपण आंबिल बनवून घेऊ शकतो. यामुळे ती पचायला आणि आपला सकस आणि पौष्टिक आहार म्हणून आपल्याला फायदेशीर होऊ शकते. ही पेस्ट यासाठी की उन्हाळ्यात आपली भूक मंदावलेली असते आणि अशा वेळेस आपल्याला जेवण जास्त जात नाही त्यासाठी हे अशी नाचणीची, ज्वारीची पेज घ्यावी. 



आता तुम्ही म्हणाल जर बाहेर गेलो तर मग हे कसं शक्य असेल. तर अशा वेळेस तुम्ही याच धान्यांच्या पावडरचे लाडू बनवून घेऊ शकता जेणेकरून प्रवासादरम्यान सहज हाताळू शकता. मग अशा वेळेस तुम्ही नाचणीचे ,ज्वारीचे, हिरव्या मुगाचे ,मिक्स धान्यांचे लाडू घेऊ शकता. जर आपण अशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर हा उन्हाळा ही आपल्याला मजेशीर जाणार.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून आमच्याकडून काय अपेक्षित आहे तेही आम्हाला कळवा. धन्यवाद 🙏

खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


 

https://www.facebook.com/vaivi.foods

 

https://www.instagram.com/vaivifoods/

 

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ

 




भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...