Sunday, 4 April 2021

लाडू चा इतिहास # Ladoo's History

लाडूचा इतिहास आणि त्याच्यामध्ये दडलेली काही गुपित.

 तुम्हालाही आवडेल ना वाचायला..



नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या.🙏🏻🙏🏻वैवी चा असा संकल्प आहे की,येत्या तीन वर्षांमध्ये भारतीय पारंपारिक खाद्य संस्कृती च्या मार्फत 50000 कुटुंबीयांना लाडू मार्फत सुदृढ बनवायचे आहे.. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत वाचा..


अन्न हे पूर्णब्रम्ह अन्नाला ब्रह्माची उपाधी दिलेली आहे,म्हणजेच अन्न हे आदरणीय आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये अन्नग्रहण करण्याआधी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. अशाच या अन्नाचे शास्त्र म्हणजे आहारशास्त्र आपण जाणून घेणार आहोत..

मनुष्य प्राण्याचा जन्म जरी स्त्री गर्भातून झाला असेल तरी तो एक निसर्गाचाच अपत्य आहे आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी निसर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो.

तर चला मग आपण लाडू चा इतिहास जाणून घेऊया...

लाडू हा महाराष्ट्रात तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्ठान्न या विविध घटक पदार्थांपासून बनवले जाऊ शकतात जसे की मुग, रवा,बेसन तसेच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत बुंदीचे लाडू आहेत अशा वेगवेगळ्या  पीठाचाआणि यासारख्या मुख्य घटकांसोबत लाडवंती गोड चवीसाठी जर गुळाचा वापर केला आणि त्यात तूप वापरले तर तो पौष्टिक गुण देण्यासोबतच चवीलाही वेगळेपणा देतो.

सर्वात आधी लाडू हा औषधी होता पण आता त्याने मिठाईची जागा घेतलेली आहे..बदललेली जीवनशैली पाहता डॉक्टरांनी लाडू खाण्यावर बंधनं आणली असली तरी पहिल्यांदा लाडूचा वापर हा औषध म्हणून केला गेला होता. राष्ट्रीय गोड पदार्थ म्हणून जर कोणत्या पदार्थाची निवड करायची असेल तर तो लाडू सर्वात अग्रस्थानी असेल.देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात गेलात की लाडूचे वेगळे प्रकार पाहायला, चाखायला मिळतातच पण त्या मागचा इतिहास आणि उपयोगही अचंबित करून टाकणारा आहे..



कोणताही मोठा सण असो बारस असो लग्न असो त्यावेळेस लाडू वाटण्याची प्रथा आहे.. लाडू चा सर्वात सुरूवातीचा उल्लेख हा "नल पाकशास्त्र" या प्रसिद्ध ग्रंथात केला गेला आहे. त्यामध्ये तिळगुळाचे लाडू  याबद्दलची माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्याकाळी रोगावरील उपचारानंतर त्याला तिळगुळाचे लाडू दिला जात होता तीळ गुळ आणि शेंगदाणे पासून तयार होणारा हा स्निग्ध पदार्थाचा लाडू रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम असल्यामुळे त्या रोग्याला  antiseptic म्हणून देत असत.तसेच ज्या स्त्रियांची पाळी जात आहे आणि ज्यांना पाळी मध्ये त्रास होतो अशा स्त्रियांसाठी हे अशा प्रकारचे वेगवेगळे आयुर्वेदिक लाडू एक उत्तम औषध म्हणून देत असत..

जगातील पहिला शल्यचिकित्सक म्हणून ओळख असलेला सुश्रुत रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना विविध घटकांपासून तयार केलेली औषधे देताना त्यामध्ये गुळ किंवा मध टाकून त्याचा गोळा तयार करत असत जेणेकरून औषध प्रवासासाठी आणि खाण्यास सहज सुलभ होतील..पुढे हाच तर्क लावून टिकाऊपणा आणि प्रवासादरम्यान ची हाताळणी लक्षात घेता विविध प्रदेशातील लोकांकडून स्थानिकरीत्या उपलब्ध घटकांपासून लाडू तयार करण्याची रूढी परंपरा निर्माण झाली.



दक्षिण भारतातील नारियल नाकरू हा पदार्थ लाडवाचा अतिशय जुना वंशज मानला जातो. नारळापासून तयार केलेले हे लाडू चौला साम्राज्यात सैनिक लढाईवर जाताना एक शुभेच्छा चे प्रतीक म्हणून त्यांच्यासोबत दिला जात असे. तसेच वैदिक काळातील भगवान मुरुगणला त्या काळापासून आजतागायत बाजरी चे लाडू देण्यात येतात हा लाडू एक नैवेद्य म्हणून देवाला चढवला जातो.



लाडू तयार करण्यासाठी गूळ आणि मधाचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात आहे. तर अशाप्रकारे हा लाडू चा इतिहास आपण बघितला.. पण त्याचबरोबर त्या लाडू चे गुणधर्म तेवढेच महत्त्वाचे आहेत.. आपली धावपळीच्या वेळेत आपला वेळ ही वाचला जातो आणि सकस आणि पौष्टिक आहार असा  आपल्याला मिळतो.हे जर लाडू तुम्ही वेगवेगळ्या धान्यापासून बनवते आणि त्याच्यात योग्य प्रकारे गुळाचा तुपाचा सुकामेवा याचा जर वापर केलात तर तो अधिक पौष्टिक होईल.तर हा लाडू चा इतिहास आणि त्याचा अचंबित करणाऱे गुणधर्म  तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा..


हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून आमच्याकडून काय अपेक्षित आहे तेही आम्हाला कळवा. धन्यवाद 🙏

खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


 

https://www.facebook.com/vaivi.foods

 

https://www.instagram.com/vaivifoods/

 

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ

 


2 comments:

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...