Wednesday, 24 November 2021

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....



भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करता का? Conference, मिटिंग मध्ये बोलताना तुम्हाला पण uncomfortable वाटते का? आपण चारचौघात बोलताना काही चुकीचं बोलू याची भीती वाटते का? आणि  हे सर्व का होत असेल असे प्रश्न पडतात का?

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं नाही का? मग हे सुंदर दिसण्याचे खरं रहस्य काय आहे बरं?? फक्त महागड्या कॉस्मेटिक आणि नेहमी पार्लरमध्ये जाऊन चालणार का,  तर नाही . तर चला मग आपण जाणून घेऊया असं का होत असेल बरं...


नमस्कार वैवि फुड्स मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वैवि म्हणजेच वैशाली आणि विद्या,वैवि फुड्स मध्ये पन्नास प्रकारचे लाडू बनवले जातात. आम्ही हेल्दी फूड प्रॉडक्टवर काम करतो, म्हणजेच काय तर भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृतीला जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो.येत्या तीन वर्षात वैविला भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती द्वारे 50 हजार कुटुंबियांना सुदृढ बनवायचे आहे आणि हा वैवि चा ध्यास आहे.


आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मी सुंदर नाही,मी बांधेसूद नाही, माझा रंग सावळा आहे, व शरीर सुटलेलं आहे. यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी मागे मागे राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला आत्मविश्वास घालवून बसतो. तुम्हाला माहिती आहे का जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल तर भारतीय आहार किती महत्त्वाचा आहे?आधी आपण हे लक्षात घ्यायला हवं की सौंदर्याचा मार्ग हृदया पासून सुरू होतो आणि कर्तुत्वापाशी जाऊन थांबतो जर तुम्ही तो मार्ग सुंदर केला तर तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा.




सर्वात आधी हे जाणून घेऊया की जर आपला आहार सकस पौष्टिकअसेल तर तो आपल्या शरीराला चांगल्याप्रकारे काम करतो . नियमित तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे व्यायाम करणे तसेच सात्विक आणि पौष्टिक आहार घेणं हे आपल्याला व फायदेशीर ठरतं. सर आपण कशाप्रकारे आपला आहार निवडावा आता थंडीचे दिवस आले आहेत त्यामुळे जास्त भुक लागते, म्हणून आपण कधीही कोणत्याही वेळेत काहीही खाणं, हे चुकीचे ठरू शकते त्यामुळे आपलं वजन वाढले जातं आणि शरीरात जडपणा जाणवतो. तसेच थंडीमध्ये चेहरा काळवंडला जातो चेहरा सुकला ही जातो. यासाठी आपल्याला आपला योग्य तो आहार निवडावा लागणार.


१) तूप :



 शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे यासाठी आपण तुपाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमित योग्य प्रमाणात खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते तसेच आपली हाडं सुद्धा बळकट होतात आणि चेहऱ्यावर एक चमक निर्माण होते.


२)  मेथी :


 मेथी मुळे बऱ्याचशा समस्या कमी होतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच ज्यांचे जास्त पोट सुटलेले आहेत पोटाभोवती अति प्रमाणात चरबी साठलेली असते ती या मेथी मुळे कमी करण्यास मदत होते. केसांच्या समस्या मेथी मुळे कमी होतात. स्त्रियांना कंबर दुखीचा जत्रा असतो तो मेथी मुळे कमी होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात मेथी खाणे अति  लाभदायक असते. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णांसाठी हे अमृत समान आहे मेथीदाणे anemia म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तसेच हार्मोन संतुलित राहण्यास मदत करते दररोज तीन ग्रॅम मेथीदाणे महिलांनी खाल्ल्यास कंबरदुखीचा त्रास कमी होतो.


3) अळशी :





अळशी हे बहुगुणी निसर्गाने दिलेले एक वरदान आहे. अळशी चा नियमित वापर केल्याने वजन कमी होण्यास शारीरिक लवचिकता भरून काढण्यास मदत होते. आळशी ही Omega 3 fatty acid seed आहे. सांधेदुखी जसे गुडघेदुखीचा त्रास अळशी मुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतो.


४) डिंक :


डिंक हा बाबळीच्या झाडापासून तयार केला जातो. बाभळीच्या झाडातला जो द्रव बाहेर पडतो त्याला सूकून त्याचा डिंक तयार होतो डिंक हे आपल्या सांध्यांना वंगण घालायचे काम करते डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आवश्यक असणारी पोषक तत्व अंकामध्ये असतात. डिंक मध्य-पूर्व गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि पंजाब मधील काही भागात आढळतो आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींना डिंक फायदेशीर ठरतो.

तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला भारतीय आहार जर योग्य स्वरूपात घेतला तर नक्कीच आपण  शरीराने तंदुरुस्त राहू तेव्हा त्याची चमक आपल्या चेहऱ्यावर आपसुकच येते आणि आपल्याला सुंदर दिसण्यात मदत होते. आणि आपण जेव्हा सुंदर दिसतो त्यामुळे आपला आत्मविश्वास ही वाढतो आणि आपण नेहमी तजेलदार राहतो. 

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला जर अजून आमच्याकडून काही अपेक्षा असतील किंवा तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल तर नक्कीच काही सूचना आम्हाला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.🙏🏻🙏🏻


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ 


Photo Courtesy: Google images🙏🏻🙏🏻



Friday, 9 July 2021

प्रवासादरम्यान सहज सुलभ हाताळण्या जोगी, काही पौष्टिक पारंपरिक पदार्थ.. #Travel&Food



लांबच्या प्रवासाला जाताना तुम्ही तुमच्या खाण्याच्यी कशाप्रकारे काळजी घेता? जेव्हा आपण बाहेरगावी जातो तेव्हा सर्व सोयी सुविधा सोयीस्कर होतात. पण खाण्याच्या बाबतीत थोडी तडजोड करावीच लागते प्रत्येक देशाच्या संस्कृतीप्रमाणे तिथेल आहार आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. अशावेळेस आपण जंक फूडच्या आहारी न जाता सकस आणि पौष्टिक आहार कसा घ्यावा  हे बघणार आहोत..



मातेच्या गर्भात असलेल्या बाळावर जसे गर्भ संस्कार होतात तसेच गर्भवती महिला नऊ महिने जो आहार घेत असते त्याचा परिणाम बाळाच्या विकास विकास वाढीवर होतो. आणि नंतर ते बाळ ज्या वातावरणात वाढत असतो आहार दिला जातो त्याला त्याची सवय लागलेली असतील मग अशी मुलं शिकण्यासाठी किंवा कामासाठी बाहेर गावी जातात तेव्हा त्यांच्या आहारात बदल होत असतो. आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या घरातल्या जेवणाची आठवण येते मग अशा वेळेस आपण काय करावे?



नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.🙏🏻 म्हणजेच वैशाली आणि विद्या एक बालमैत्रिणी आणि आता एक उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. वैवी ची ओळख ही लाडू सम्राज्ञी म्हणून आहे. Vaivifoods मध्ये चाळीस प्रकारचे लाडू बनवले जातात हे लाडू वेगवेगळ्या धान्यापासून तयार होतात त्यामध्ये सेंद्रिय गूळ,गाईचे तूप, oil-seeds ,ड्रायफ्रूट्स हे वापरले जाते त्यामुळे दिवसभराची शारीरिक ऊर्जा भरून काढण्यास मदत होतेच पण रोगप्रतिकारशक्ती भरून निघण्यास ही मदत होते. आणि तसेच आपल्याला चौरस सकस आणि पौष्टिक असा आहार मिळतो..वैवि चे असे ध्येय आहे की येत्या तीन वर्षात 'भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती' द्वारे 50,000 कुटुंबीयांना सुदृढ बनवायचे आहे..😊🙏🏻


जेव्हा आपण बाहेरगावी किंवा फिरायला जातो तेव्हा अशा प्रकारे चे लाडू तुम्ही घरी बनवू शकता जे एक ते दीड महिने सहज टिकतात.हे लाडू आपण आपल्या डायट नुसार सुद्धा बनवू शकता जसे ज्यांना वेटलॉस करायचे आहे त्यांनी वर्कआउट नंतर फ्लॅक्ससीड विथ.ओट्स  हा लाडू घेऊ शकता. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नाचणीचे लाडू घ्यावा लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी आम्ही बनाना पावडर युज करून वेगवेगळे लाडू बनवतो. यामुळे मुलांची हाड ही मजबूत बनतात आणि त्यांची बौद्धिक विकास  चांगल्या प्रकारे होते. ज्यांना केस गळती चा त्रास आहे तसेच हिमोग्लोबिन आणि हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी अळीवाचे लाडू घ्यावे..

बदलत्या वातावरणामुळे आपल्याला जर सर्दी खोकला कप असा त्रास होत असेल तर सुंठीचे लाडू घेणे खूप चांगले शारीरिक विकासासाठी आणि बऱ्याच समस्या वर आपण अश्वगंधा शतावरी त्याचे सुद्धा लाडू घेऊ शकता तर अशाप्रकारे आपण जेव्हा बाहेर जातो, त्यावेळेस आपण अशा प्रकारे आहार आपण सोबत ठेवला तर आपल्याला सकस , पौष्टिक आहार तर मिळतोच, आणि आपल्या बाकीच्या समस्याही दूर होतात..
आताची बदलती जीवनशैली व त्यामुळे खूप कमी वयातच बराच शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागेल जसे की सकाळी येणारा मेनोपॉज शारीरिक थकवा सांधेदुखी आणि अशा बऱ्याच समस्यांवर अश्वगंधा आणि शतावरी याचे लाडू सुद्धा आपण घेऊ शकतो.

तर मित्रांनो हे सर्व आपण भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृती जोपासून तयार करण्यात आलेले लाडू आहेत.. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात गेलात तरी भारतीय खाद्यसंस्कृती प्रथम क्रमांकावर आढळून येते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद🙏🏻🙏🏻

जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ



Wednesday, 9 June 2021

अपुऱ्या जीवनसत्वाचा अभाव आणि त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम

      







आपल्या आहारात जीवनसत्त्व,खनिज पदार्थ अमायनो आम्ले असे प्रथिने तयार करणारे अनेक घटक असतात. या सर्व घटकांमुळे शरीरात उत्साह आणि चैतन्य निर्माण होते. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. आणि दीर्घायुष्याचा लाभ होतो. आरोग्य चांगले असेल तर मोठे यश मिळवू शकतो, म्हणून म्हणतात ना ''शीर सलामत तो पगडी पचास'' आपल्या आहारामध्ये असणाऱ्या अनेक घटकांमुळे शरीरात नवीन पेशी तयार होतात आणि शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे आणि ग्रंथीचे आरोग्य टिकून राहते.









नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या.🙏🏻 VAIVI FOODS मध्ये चाळीस प्रकारचे सात्विक पौष्टिक आणि अप्रतिम चवीचे लाडू बनविले जातात या लाडू ची खासियत प्रत्येक वयोगटानुसार आणि शारीरिक समस्या नुसार लाडू तयार केले जातात. सात ते आठ महिन्याच्या बाळापासून ते अडीच वर्षाच्या बाळापर्यंत त्यांना देण्यात येणारा जो आहार आहे तो या लाडू मार्फत पूर्ण होतो. म्हणजेच आपण ज्या पावडरींचा किंवा ज्या मिक्स धान्यांच्या वापर करतो पेज बणवण्यासाठी त्याच प्रकारे आपण लाडू त्यांना देऊ शकतो म्हणजे या लाडू मध्ये मिक्स धान्य  किंवा नाचणी सत्व, त्यामध्ये वापरण्यात आलेले गुळ, ड्रायफ्रूट पावडर, गाईचे साजुक तूप याचा वापर होतो. यामुळे त्यांचा सकस आहार तयार होतो. आणि हे लाडू प्रवासादरम्यान हाताळण्यासाठी सहज सुलभ होऊन जातात..तसेच वृद्धांना सुद्धा या लाडूचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो.वैवी चे असे ध्येय आहे की येत्या तीन वर्षात 50,000 कुटुंबीयांना भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती मार्फत सुदृढ बनवायचे आहे यासाठी वैवी चा खारीचा वाटा नक्कीच असेल.. जीवनसत्वाचा अभाव असण्याची अनेक कारणे आहेत आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.

रातांधळेपणा हा जीवनसत्वाचा अभाव दाखवणारा रोग आहे. यासाठी आपल्याला 'अ' जीवनसत्व घेणं अत्यंत गरजेचं ठरतं.'अ' जीवनसत्वाचा अभाव टाळण्यासाठी लहान मुलांना मोठ्या प्रमाणात 'अ ' जीवनसत्त्व देतात आणि ते सुद्धा योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे जर चुकीच्या प्रमाणात दिले तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. धान्य, डाळी ,भाज्या कठीण कवचाची फळे मासे, अंडी, दुधाचे पदार्थ तूप अशा पदार्थांमधून काही प्रमाणात 'अ' जीवनसत्त्व मिळतात.









माणूस आपलं पारंपरिक खाणंपीण बदलत चालला आहे.तर कधी वेळेच्या अभावामुळे घडला जातो.. अशा वेळी आहार जर चुकीचा ठरला की पचनसंस्थेमध्ये बिघाड होत जातो.हल्ली तर आपण फक्त बोलतो "अन्न हे पूर्णब्रम्ह"पण त्याचा संबंध शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्याशी आहे. हे मात्र आपण विसरतो.समतोल आहार ही संकल्पना शास्त्रावर आधारलेली आहे. हे शास्त्र जीवनाचं म्हणजे 'लाईफ' आहे. शरीराची प्रतिकारशक्ती उंचावण अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रोटीन, 'अ','ड', 'क' 'ई' इतकी जीवनसत्व, कॅल्शियम घेणं गरजेचं असतं. याच बरोबर दररोज व्यायाम करणं, ध्यान करणं हेही तितकंच गरजेचं आहे. यामुळे आपली जीवनशैली बदलायला मदत होते. आणि आपण निरोगी आयुष्य जगू... म्हणून म्हणतात ना... अगर पेट हो, नरम। और पांव  हो गरम। तो दिमाग रहेगा ठंडा। और बैदको मिलेगा डंडा।

हा ब्लॉक शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका कारण या ब्लॉग मुळे कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो.. धन्यवाद🙏🏻🙏🏻


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ


Wednesday, 2 June 2021

बहुगुणी केळी #HealthyBanana


 

बहुगुणी केळी पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. गरीब असो की श्रीमंत लहान असो का मोठे प्रत्येकालाच परवडणारी आणि आवडणारी फळ म्हणजे केळी. केळी बारा महिने बाजारात मिळतात. कितीतरी आजारांवर उपयुक्त अशी ही केळी असतात. केळीच्या जातीसुद्धा वेगवेगळ्या बघायला मिळतात. वसईची केळी तर फारच प्रसिद्ध आहेत. साउथ मध्ये मिळणारी केळी लांबलचक आणि बहुगुणी असतात तर देशी केळीचा आकार फारच लहान पण चवीला फार गोड असतात. केळा बाबतीत बरयाच जणांचे समज-गैरसमज असतात. केळी फक्त वजन वाढवायचे काम नाही करत तर त्याने वजन कमी सुद्धा होते पण ते खाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर चला पाहू या केळांचे वेगवेगळे गुणधर्म.
 

नमस्कार वैवी फूडमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या.. वैवी फूडमध्ये चाळीस प्रकारचे सात्विक,पौष्टिक  आणि अप्रतिम चवीचे लाडू बनविले जातात या लाडू ची खासियत अशी आहे की प्रत्येक वयोगटानुसार आणि शारीरिक समस्यानुसार लाडू तयार केले जातात सात ते आठ महिन्याच्या बाळापासून ते अडीच वर्षाच्या बाळाला पर्यंत तसेच रुग्णांना सुद्धा या लाडूचा चौरस आहार म्हणून उपयोग होतो. वैवीचे असे ध्येय आहे की येत्या तीन वर्षात 50,000 कुटुंबीयांना भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती मार्फत सुदृढ बनवायचे आहे. तर चला मग आता आपण पाहूया केळीचे महत्व.


केळी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांतील रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. केळ्यातील मॅग्नेशियम मुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही पचनक्रियाचा जर त्रास असेल तर केळ खाणं फायदेशीर ठरते. कारण त्यातील फायबर सारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात, त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी नक्की केळे खावे. केळे आणि वेलदोडे एकत्रित खाल्ल्याने अर्धशिशी बरी होते. केळ्यामध्ये serotonin हे द्रव्य असते त्यामुळे अर्धशिशी च्या रुग्णाने केळी खाताना काळजी घ्यावी कारण अर्धशिशी अटॅक 'सिरोटोनिन' चे प्रमाण वाढल्याने येऊ शकतो.



कच्या केळीचा उपयोग - कच्या केळीचे वेफर्स हे साऊथ मध्ये फार प्रसिद्ध आहेत. तसेच कच्ची केळी सुकवून त्याची पावडर केली जाते जे वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थात वापरली जाते अतिसार होत असल्यास कच्च्या केळीची भाजी करून खाण्याचा सल्ला दिला जातो किंवा कच्चा केळीला सुंठ लावून खावी.



याच केळीचा उपयोग सौंदर्यासाठी सुद्धा केला जातो. घरगुती उपाय म्हणून बर्‍याच प्रकारे वेगळ्या पद्धतीने केळीचा वापर होतो. चेहऱ्याला तजेलदार ठेवण्यासाठी केळी चा फेसपॅक म्हणून वापर केला जातो केळं कुस्करून त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा हा पॅक 15 ते 20 मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवावा त्यानंतर चेहरा धुवावा यामुळे त्वचा तजेलदार व टवटवीत होते.


केळीच्या सालीचे उपयोग - दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळीची पिवळी साल गुणकारी ठरते. केळीची साल दोन मिनिटे दातावर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावावी त्यामुळे होणारी जळजळ थांबते आणि लवकर आराम मिळतो. तसेच झटक्यामुळे येणारे त्वचेवरील डाग तेही लवकर निघून जातात. तर अशाप्रकारे केळीचे बरेच फायदे आपण पाहिले.


हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद🙏🏻


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ


Sunday, 16 May 2021

तुम्हीच व्हा तुमच्या आरोग्याचे सूत्रधार #HealthisWealth


वातावरणात प्रदूषण निर्माण करणारा माणूसच आणि स्वतःच्या शरीरात प्रदूषण निर्माण करणारा हा सुद्धा माणूसच असतो.

कारण निसर्गाच्या विरोधात जाऊन मनाला वाटेल तेव्हा आणि मनात येईल तेवढं काहीही खाणं घरच्या पेक्षा बाहेरचे जास्त खाणे यामुळे शरीरात निष्पन्न होणारे त्रास याला माणूसच जबाबदार ठरत असतो.

योग्य वेळेत न खाणं,अवेळी खाणं, सूर्योदयानंतर उठणं,शरीराची हालचाल कमी करणं तसेच सूर्योदय होऊन गेला की सूर्याची किरणं शरीराला न मिळाल्यामुळे शरीरात ( ड) जीवनसत्त्वाची कमतरता भासते, यामुळे आलेल्या शारीरिक आजाराला माणूसच कारणीभूत ठरतो. जर तुम्हाला अशा समस्यांना सामोरे जाऊ नये असे वाटत असेल,तर त्यासाठी जाणून घ्या "आरोग्याचे सूत्रधार" तर हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत वाचा.

नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.🙏🏻

वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या 🙏🏻वैवी मध्ये तीस ते चाळीस प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात जे प्रत्येक सणानुसार आणि प्रत्येक शारीरिक व्याधी नुसार त्याचा उपयोग होतो.. येत्या तीन वर्षांमध्ये आम्हाला 50 हजार कुटुंबियांना या लाडू मार्फत सुदृढ बनवायचे आहे असे वैवी चे ध्येय आहे.🙏🏻🙏🏻 

तर चला मग तुम्हीच व्हा तुमच्या आरोग्याचे सूत्रधार"*

बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही, अशी नेहमी उडवा उडवीची कारण आपण देत असतो... समाजात जेवढे पण यशस्वी लोक आहेत त्यांना जेवढा वेळ मिळतो तेवढाच वेळ आपल्यालाही निसर्गाने दिलेला आहे. मग ही कारण कशासाठी?


जर आपण आपले ध्येय निश्चित केलं तर अशी कारणं द्यायला आपल्याकडे वेळच नसतो, आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम राहणं सोपं जातं... निसर्गाचं घड्याळ आणि पोटाचे घड्याळ हे सारखेच चालते म्हणून त्याप्रमाणे आपण आपला सकस आणि पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे.. प्रत्येक वेळेस आपल्या हातात सहज सर्व भेटलंच असे नाही, कामानिमित्त बाहेर जाणं झालं की खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्या जातात अशा वेळेस काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच असतो.

आपल्या कामाच्या वेळेनुसार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे जर आरोग्य  नीट नसेल तर मिळणाऱ्या यशाचे स्वागत आपण करू शकणार नाही किंवा ते आनंदाचे क्षण आपण अनुभवू शकणार नाही यासाठी वेळेचे नियोजन आखून खाण्यापिण्याची पूर्वतयारी असणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही नियोजन करताना ते सुटसुटीत असावं म्हणजे ते पूर्ण करताना कंटाळा येणार नाही.

आता आपण आपला आहार कसा असावा हे पाहूया.


प्रथम अन्नपदार्थाची माहिती करून घ्या त्यानंतर कोणते अन्नघटक कोणत्या अन्नपदार्थ मिळतात याची नोंद घ्या आपल्या आहारात प्रत्येक अन्नघटकांचा बदल करून समावेश असावा. नेहमी चौरस आहार घेण्याकडे लक्ष असावं.

उत्तम चित्रकलेसाठी जसे सात रंग, उत्तम गायकीसाठी सात सूर तसेच उत्तम आरोग्यासाठी सात अन्नघटक-प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स,मिनरल्स, व्हिटामिन्स, पाणी आणि प्राणवायू या सात घटकांचा समावेश असावा. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला आहारात बदल करणे तसेच ऋतूप्रमाणे आहार घेणे, स्थानिक आहार आणि हंगामी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जसे सेंट्रल इंडिया मध्ये शेंगदाणे पिकले जातात म्हणून तेथील लोक शेंगदाण्याचा वापर जास्त करतात, साउथ इंडिया मध्ये नारळ जास्त पीकला जातो म्हणून तेथे नारळाचा वापर जास्त होतो उत्तर भारतात मोहरीचे पीक जास्त पीकले जाते म्हणून तेथील रहिवाशी मोहरीच्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करतात. आपण जिथे राहतो तेथील वातावरणानुसार आपला आहार असावा, आणि निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या प्रत्येक नियमाचे पालन करावे. आपल्या देशात जिल्ह्यात कोणते  पीक व्हावे हे निसर्ग ठरवत असतो आणि त्यावर आपलं आहार कसा असावा हे सुद्धा निसर्ग ठरवतो. म्हणून अशाप्रकारे आपणच आपल्या आरोग्याचे सूत्रधार ठरत असतो.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद🙏🏻


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ


Friday, 9 April 2021

स्त्री आणि आरोग्य


नमस्कार वैवी फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या लाडूसम्राज्ञी 🙏🏻🙏🏻 वैवि फूड्समध्ये चाळीस प्रकारचे लाडू बनविले जातात. जे प्रत्येक वयोगटानुसार आणि वेगवेगळ्या शारीरिक आजार आजारांवर सुद्धा घेतले जाऊ शकतात. तसेच आपण एखाद्याला मिठाई जर गिफ्ट करत असाल तर हे पौष्टिक लाडू अतिउत्तम ठरतील. वैविला येत्या तीन वर्षात 50,000 कुटुंबियांना भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती च्या मार्फत सुदृढ करायचे आहे, असे वैवी चे ध्येय आहे यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा🙏🏻




स्त्री आणि आरोग्य संपदा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...

स्त्रियांच्या आरोग्याबद्दल नेहमीच खंत व्यक्त केली जाते आणि खंत व्यक्त करताना नेहमीच असं म्हटलं जातं की 'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी'  स्त्रियांच्या जन्म जन्मांतरीची आरोग्याची ग्वाही देणार हे एक सत्य वचन आहे. त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी..




डॉ. आनंदीबाई डॉक्टर होण्यासाठी अमेरिका गेल्या होत्या, पण त्या जेव्हा परतल्यावर तेव्हा इतक्या  जर्जर रोगाने बाधित झाल्या होत्या की अपायकारक जीवजंतू ने शेवटी त्यांच्या शरीराचा व मनाचा ताबा घेतलाच. आणि आरोग्य देणं हेच ज्यांचे कर्तव्य असतं त्या डॉक्टरांनीही त्यांना नाकारलं आणि आजही एकविसाव्या शतकातल्या बऱ्याच स्त्रिया कर्तव्यापोटी आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता काम करतात आणि मोठ्या आजारांना बळी पडतात म्हणून यावर काय उपाय असावा त्याकरिता हा ब्लॉग लिहीण्यात आला आहे.

हीच स्त्रीयांच्या जन्माची कहाणी जन्मापासून-वाढ प्रजनन, ऋतु समाप्ती आणि वृद्धापकाळ या सर्व अवस्थांमधून जात असताना ती कायमच स्वतःहून कुपोषित अवस्थेत काळ काढत असते. यात श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव नसतो आणि हेच आनंदीबाईंन सोबत घडले.


जर आपण स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर पुढील प्रमाणे.होईल ...




*दुध घेतलं नाही तर हाडांची उंची वाढणार नाही आणि पाळीच्या तक्रारी निर्माण होतात.

* शरीराची लवचिकता कमी होते.

* नजर दृष्टी कमी होते.

* सांधे वातीचा त्रास, कफ, पित्त असे आजार उत्पन्न होऊन त्यातून अनेक आजार निर्माण होतात.

* स्वतःबद्दलचा आत्मविश्वास गमावतो.


जीवनाच्या संघर्षामध्ये टिकून राहायचं असेल, तर आतला आवाज उठवणे इतपत ताकद यायला हवी. खाण्यापिण्याचे हाल करून ही शक्ती मिळणारच नाही आजच्या काळात बरोबरीने चालण्यासाठी जरूर प्रयत्न करा पण त्यासाठी स्वतःची जास्त काळजी घ्या.



*सकाळी घर सोडताना कॅल्शियम आणि प्रोटिन युक्त नाश्ता घेणे खायला वेळ नसेल तर सोबत बांधून घेणे.

*  दुपारी चौरस आहार घेणे जात प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स हवी.

*. संध्याकाळी पुन्हा घरात केलेले काही पदार्थ जसे ढोकळा आहे थालीपीठ आहेत किंवा एखादा लाडू अशाप्रकारे तसेच काही फळं खाणं.

* रात्री पिष्टमय पदार्थ घेणे यावेळेस कमी तेलकट तिखट असं अन्न घेणे.

* याच बरोबर रोज सकाळी व्यायाम,प्राणायाम,मेडिटेशन करणे तितकेच गरजेचे आहे. वेळ नाही म्हणून कारण सांगणे टाळावे आणि स्वतःसाठी कमीत कमी एक तास तरी लवकर उठून वेळ काढावा. जर अशाप्रकारे आपण आपली काळजी घेऊ शकलात तर खूप चांगले निरोगी आयुष्य आपण जगू शकतो.


हा ब्लॉग डॉक्टर मालती कारवारकर यांच्या वाचलेल्या पुस्तकातून तसेच त्यांच्या प्रेरणेतून घेण्यात आलेला आहे काही चुकल्यास क्षमा असावी.. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा.🙏🏻🙏🏻


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


https://www.facebook.com/vaivi.foods

https://www.instagram.com/vaivifoods/

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ



Sunday, 4 April 2021

लाडू चा इतिहास # Ladoo's History

लाडूचा इतिहास आणि त्याच्यामध्ये दडलेली काही गुपित.

 तुम्हालाही आवडेल ना वाचायला..



नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या.🙏🏻🙏🏻वैवी चा असा संकल्प आहे की,येत्या तीन वर्षांमध्ये भारतीय पारंपारिक खाद्य संस्कृती च्या मार्फत 50000 कुटुंबीयांना लाडू मार्फत सुदृढ बनवायचे आहे.. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत वाचा..


अन्न हे पूर्णब्रम्ह अन्नाला ब्रह्माची उपाधी दिलेली आहे,म्हणजेच अन्न हे आदरणीय आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये अन्नग्रहण करण्याआधी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. अशाच या अन्नाचे शास्त्र म्हणजे आहारशास्त्र आपण जाणून घेणार आहोत..

मनुष्य प्राण्याचा जन्म जरी स्त्री गर्भातून झाला असेल तरी तो एक निसर्गाचाच अपत्य आहे आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी निसर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो.

तर चला मग आपण लाडू चा इतिहास जाणून घेऊया...

लाडू हा महाराष्ट्रात तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्ठान्न या विविध घटक पदार्थांपासून बनवले जाऊ शकतात जसे की मुग, रवा,बेसन तसेच वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत बुंदीचे लाडू आहेत अशा वेगवेगळ्या  पीठाचाआणि यासारख्या मुख्य घटकांसोबत लाडवंती गोड चवीसाठी जर गुळाचा वापर केला आणि त्यात तूप वापरले तर तो पौष्टिक गुण देण्यासोबतच चवीलाही वेगळेपणा देतो.

सर्वात आधी लाडू हा औषधी होता पण आता त्याने मिठाईची जागा घेतलेली आहे..बदललेली जीवनशैली पाहता डॉक्टरांनी लाडू खाण्यावर बंधनं आणली असली तरी पहिल्यांदा लाडूचा वापर हा औषध म्हणून केला गेला होता. राष्ट्रीय गोड पदार्थ म्हणून जर कोणत्या पदार्थाची निवड करायची असेल तर तो लाडू सर्वात अग्रस्थानी असेल.देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात गेलात की लाडूचे वेगळे प्रकार पाहायला, चाखायला मिळतातच पण त्या मागचा इतिहास आणि उपयोगही अचंबित करून टाकणारा आहे..



कोणताही मोठा सण असो बारस असो लग्न असो त्यावेळेस लाडू वाटण्याची प्रथा आहे.. लाडू चा सर्वात सुरूवातीचा उल्लेख हा "नल पाकशास्त्र" या प्रसिद्ध ग्रंथात केला गेला आहे. त्यामध्ये तिळगुळाचे लाडू  याबद्दलची माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्याकाळी रोगावरील उपचारानंतर त्याला तिळगुळाचे लाडू दिला जात होता तीळ गुळ आणि शेंगदाणे पासून तयार होणारा हा स्निग्ध पदार्थाचा लाडू रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम असल्यामुळे त्या रोग्याला  antiseptic म्हणून देत असत.तसेच ज्या स्त्रियांची पाळी जात आहे आणि ज्यांना पाळी मध्ये त्रास होतो अशा स्त्रियांसाठी हे अशा प्रकारचे वेगवेगळे आयुर्वेदिक लाडू एक उत्तम औषध म्हणून देत असत..

जगातील पहिला शल्यचिकित्सक म्हणून ओळख असलेला सुश्रुत रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना विविध घटकांपासून तयार केलेली औषधे देताना त्यामध्ये गुळ किंवा मध टाकून त्याचा गोळा तयार करत असत जेणेकरून औषध प्रवासासाठी आणि खाण्यास सहज सुलभ होतील..पुढे हाच तर्क लावून टिकाऊपणा आणि प्रवासादरम्यान ची हाताळणी लक्षात घेता विविध प्रदेशातील लोकांकडून स्थानिकरीत्या उपलब्ध घटकांपासून लाडू तयार करण्याची रूढी परंपरा निर्माण झाली.



दक्षिण भारतातील नारियल नाकरू हा पदार्थ लाडवाचा अतिशय जुना वंशज मानला जातो. नारळापासून तयार केलेले हे लाडू चौला साम्राज्यात सैनिक लढाईवर जाताना एक शुभेच्छा चे प्रतीक म्हणून त्यांच्यासोबत दिला जात असे. तसेच वैदिक काळातील भगवान मुरुगणला त्या काळापासून आजतागायत बाजरी चे लाडू देण्यात येतात हा लाडू एक नैवेद्य म्हणून देवाला चढवला जातो.



लाडू तयार करण्यासाठी गूळ आणि मधाचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात आहे. तर अशाप्रकारे हा लाडू चा इतिहास आपण बघितला.. पण त्याचबरोबर त्या लाडू चे गुणधर्म तेवढेच महत्त्वाचे आहेत.. आपली धावपळीच्या वेळेत आपला वेळ ही वाचला जातो आणि सकस आणि पौष्टिक आहार असा  आपल्याला मिळतो.हे जर लाडू तुम्ही वेगवेगळ्या धान्यापासून बनवते आणि त्याच्यात योग्य प्रकारे गुळाचा तुपाचा सुकामेवा याचा जर वापर केलात तर तो अधिक पौष्टिक होईल.तर हा लाडू चा इतिहास आणि त्याचा अचंबित करणाऱे गुणधर्म  तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा..


हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून आमच्याकडून काय अपेक्षित आहे तेही आम्हाला कळवा. धन्यवाद 🙏

खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


 

https://www.facebook.com/vaivi.foods

 

https://www.instagram.com/vaivifoods/

 

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ

 


भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...