नमस्कार वैवी फूडमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या.. वैवी फूडमध्ये चाळीस प्रकारचे सात्विक,पौष्टिक आणि अप्रतिम चवीचे लाडू बनविले जातात या लाडू ची खासियत अशी आहे की प्रत्येक वयोगटानुसार आणि शारीरिक समस्यानुसार लाडू तयार केले जातात सात ते आठ महिन्याच्या बाळापासून ते अडीच वर्षाच्या बाळाला पर्यंत तसेच रुग्णांना सुद्धा या लाडूचा चौरस आहार म्हणून उपयोग होतो. वैवीचे असे ध्येय आहे की येत्या तीन वर्षात 50,000 कुटुंबीयांना भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती मार्फत सुदृढ बनवायचे आहे. तर चला मग आता आपण पाहूया केळीचे महत्व.
कच्या केळीचा उपयोग - कच्या केळीचे वेफर्स हे साऊथ मध्ये फार प्रसिद्ध आहेत. तसेच कच्ची केळी सुकवून त्याची पावडर केली जाते जे वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थात वापरली जाते अतिसार होत असल्यास कच्च्या केळीची भाजी करून खाण्याचा सल्ला दिला जातो किंवा कच्चा केळीला सुंठ लावून खावी.
याच केळीचा उपयोग सौंदर्यासाठी सुद्धा केला जातो. घरगुती उपाय म्हणून बर्याच प्रकारे वेगळ्या पद्धतीने केळीचा वापर होतो. चेहऱ्याला तजेलदार ठेवण्यासाठी केळी चा फेसपॅक म्हणून वापर केला जातो केळं कुस्करून त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा हा पॅक 15 ते 20 मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावा त्यानंतर चेहरा धुवावा यामुळे त्वचा तजेलदार व टवटवीत होते.
केळीच्या सालीचे उपयोग - दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळीची पिवळी साल गुणकारी ठरते. केळीची साल दोन मिनिटे दातावर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावावी त्यामुळे होणारी जळजळ थांबते आणि लवकर आराम मिळतो. तसेच झटक्यामुळे येणारे त्वचेवरील डाग तेही लवकर निघून जातात. तर अशाप्रकारे केळीचे बरेच फायदे आपण पाहिले.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद🙏🏻
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/vaivi.foods
https://www.instagram.com/vaivifoods/
https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ




खूप छान ब्लॉग . Very informative कीती फायदे आहेत केळ्यांचे. thank you tips दिल्या पद्दल.
ReplyDeleteखुप छान माहिती दिली ...Thank you very much
ReplyDeleteGreat going 👏Keep it up
ReplyDeleteVery great information and intentions...I recommend and proud for vaivy foods.
ReplyDeleteकेळी बहुगुणी आहेत, थोडक्यात आणि समर्पक माहिती.
ReplyDelete