Monday, 28 September 2020

कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे दोन लाडूचे प्रकार

नमस्कार वैवी फुड्स  म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण ( लाडू सम्राज्ञी ) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण  या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय  खाद्य संस्कृतीचे महत्त्व  व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.








मित्रांनो पूर्वीच्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होता का? त्यांना कॅल्शिअमची कमतरता  जाणवत होती का? किंवा कधी त्यांचे  जॉईंटस रिप्लेस करावे लागले  का? नाही ना.  तर काय बरे कारण असेल?  उत्तर आहे पूर्वीचे पौष्टिक खाणे.


पूर्वी हिवाळा सुरू झाला की, थंडीत गरम पदार्थांचे सेवन केले  जायचे. गृहिणींची विविध प्रकारचे लाडू करण्याची लगबगही सुरू  होत असे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघत  असे.  तसेच अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात आणि त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे, तसेच कफनाशक आणि वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात.


चला तर अशा दोन लाडू प्रकाराचे फायदे  आज आपण जाणून घेणार आहोत. 



मेथी लाडू :




मेथीचा लाडू कडवट असला तरीही दिवसाची सुरवात एका मेथीच्या लाडवाने करणे फायदेशीर आहे.मेथी हा एक औषधी वनस्पती मानला जातो जो शरीराला चांगला प्रमाणात कॅल्शियम प्रदान करतो. हे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.तसेच पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. मेथी लाडूच्या नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज मेथी लाडूचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथी लाडू ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच  हे लाडू केसगळतीचा त्रास कमी करण्यासोबत त्याच्या वाढीला मदत करतात .



जवसाचे लाडू :




जवसाचे लाडूचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. आर्थरायटिस (Arthiritis) असलेल्या लोकांना गुडघ्यात आणि कंबरेत प्रचंड त्रास होत असतो. आळशीच्या तेलाने मालिश केल्यास, त्रासातून सुटका होते आणि सूजही कमी होते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड (Omega 3 fatty acid) चा समावेश असल्याने ऑस्टियोआर्थरायटिस (Ostioarthiritis) ठीक होण्यासाठीही मदत मिळते. रोज एक  जवसाचा लाडू(Flax seeds) खाल्ल्याने ऑस्टियोआर्थरायटिसच्या लक्षणातूनही सुटका मिळते. जवस खाल्याने ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. ज्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहते.यामध्ये आयरन असते जे एनीमिया दूर करण्यात फायदेशीर असते.जवस खाल्ल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनचा ग्लो टिकून राहतो .हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते आणि हार्ट प्रॉब्लेम टाळता येतो. यामध्ये प्रोटीन अधिक असते ज्यामुळे बोन्स मजबूत होतात आणि जॉइंटपेन टाळता येते . 


तर आज आपण पाहिले असे दोन लाडू चे प्रकार जे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून  काढतील. आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान पन्नास हजार कुटुंबांना आम्ही पारंपारिक  भारतीय खाद्य  पदार्थांच्या( जसे लाडू , जात्यावर दळलेल्या कन्या ) माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.


तसेच आपण यापुढील ब्लॉग मध्ये भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेणार आहोत. तसेच भारतीय खाद्य संस्कृती मध्ये छोट्या भुकेसाठी तसेच न्याहारीसाठी खूप सारे ऑप्शनस आहेत त्यांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोआहोत. चला तर मग सुदृढ भारत या  मिशनमध्ये सहभागी  होताय ना ? 


ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.


 



https://www.facebook.com/vaivi.foods


https://www.instagram.com/vaivifoods/

 

https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ

  

https://vaivifoods.blogspot.com/2020/08/blog-post.html




 

3 comments:

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...