नमस्कार वैवी फुड्स म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण ( लाडू सम्राज्ञी ) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
थंडीचे दिवस आल्यावर तुमची शारीरिक लवचिकता कमी होते का ? शरीर आणि चेहरा सुकतो का? जर या आजाराला तुम्ही सामोरे जात असाल किंवा पुढे हा त्रास तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार ! तुमच्यासाठी वैवी फुड्स घेऊन आले आहे भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषक खाद्यपदार्थ. तर चला पाहूया कोणत्या कोणत्या दोन प्रकारचे लाडू आहेतथंडीच्या दिवसातही आपल्याला शारीरिक ऊर्जा आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतील.
डिंक लाडू :
https://www.facebook.com/
सर्वप्रथम आपण डिंकाच्या लाडूचे गुणधर्म पाहूयात.डिंकाचे लाडू या लाडू मध्ये डिंक खारीक खोबरे ड्रायफ्रूट गायीचे तूप वापरले जाते ज्यामुळे सांध्यांमध्ये वंगण घालायचे काम होते आणि पाठीच्या दुखण्याचा पासून आराम मिळतो. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना ऊर्जा देण्याचे काम करते.डिंकामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते.
तसेच डिंकाचे लाडू मध्ये वापरली जाणारी इतर सामग्री मधून प्रोटीन कॅल्शियम विटामिन डी थ्री हे चांगल्या प्रमाणात मिळते त्यामुळे आपला कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.डिंकाचे चे सेवन करणे हे हृदयासाठी फार चांगले आहे कारण हे सेवन केल्याने हृदयाचे आजार आपल्या पासून खूप दूर राहतातआणि आपली ऊर्जा वाढून ठेवण्यास ही मदत करते. डिंक हे पुरुषांसाठी फार चांगले आहे. डिंक खाल्ल्याने आपल्या स्टॅमिना वाढतो.
Edible Gum Improves bone health ,skin issues, nervous system and digestion process, also good in blood pressure balance. Edible gum (dink ,gond) is a good source of energy.
उडीद लाडू:
https://www.facebook.com/
दुसरे आहे उडीद लाडू हे केवळ पौष्टिक नाहीतर औषधीही आहे अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर केला जातो शरीरासाठी पोषक असणारी उडीदडाळ यामध्ये विटामिन खनिज कॅल्शियम पोटॅशियम लोह तत्व मॅग्नेशियम तत्व भरपूर प्रमाणात असतात
आदिवासी लोक उडीदाची डाळ खाद्य तेलामध्ये गरम करून घेतात आणि त्या तेलाने मालिश करतात उडीद डाळीचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. आणि उडीद डाळ तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास व तेजस्वी ठेवण्यास मदत करते. उडदाच्या डाळीचे सेवन केल्यास आपली सांधे दुखी थांबते आणि उडदाच्या डाळीचे सेव्हन केल्याने आपल्या किडनी चे आजार न होण्यास मदत होते ही केस वाढवण्याचेही गुणकारी ठरू शकते . गर्भवती महिलेसाठी खूप खूप फायदेशीर आहे आणि मधुमेहींसाठी उडदाची डाळ ही एका औषधाप्रमाणे काम करते.
तर आज आपण पाहिले असे दोन लाडू चे प्रकार जे आपल्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतील.
आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान पन्नास हजार कुटुंबांना आम्ही पारंपारिक भारतीय खाद्य पदार्थांच्या( जसे लाडू , जात्यावर दळलेल्या कन्या ) माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.
तसेच आपण यापुढील ब्लॉग मध्ये भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेणार आहोत. भारतीय खाद्य संस्कृती मध्ये छोट्या भुकेसाठी तसेच न्याहारीसाठी खूप सारे ऑप्शनस आहेत त्यांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोआहोत. चला तर मग सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी होताय ना ?
ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/
https://www.instagram.com/
https://www.youtube.com/
https://vaivifoods.blogspot.com/2020/08/blog-post.html



Khoopch chan mahiti 👍💐💐
ReplyDeleteवाव, मस्तच
ReplyDeleteमला ही हवे हवेत लाडू