वातावरणात प्रदूषण निर्माण करणारा माणूसच आणि स्वतःच्या शरीरात प्रदूषण निर्माण करणारा हा सुद्धा माणूसच असतो.
कारण निसर्गाच्या विरोधात जाऊन मनाला वाटेल तेव्हा आणि मनात येईल तेवढं काहीही खाणं घरच्या पेक्षा बाहेरचे जास्त खाणे यामुळे शरीरात निष्पन्न होणारे त्रास याला माणूसच जबाबदार ठरत असतो.
योग्य वेळेत न खाणं,अवेळी खाणं, सूर्योदयानंतर उठणं,शरीराची हालचाल कमी करणं तसेच सूर्योदय होऊन गेला की सूर्याची किरणं शरीराला न मिळाल्यामुळे शरीरात ( ड) जीवनसत्त्वाची कमतरता भासते, यामुळे आलेल्या शारीरिक आजाराला माणूसच कारणीभूत ठरतो. जर तुम्हाला अशा समस्यांना सामोरे जाऊ नये असे वाटत असेल,तर त्यासाठी जाणून घ्या "आरोग्याचे सूत्रधार" तर हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत वाचा.
नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.🙏🏻
वैवी म्हणजेच वैशाली आणि विद्या 🙏🏻वैवी मध्ये तीस ते चाळीस प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात जे प्रत्येक सणानुसार आणि प्रत्येक शारीरिक व्याधी नुसार त्याचा उपयोग होतो.. येत्या तीन वर्षांमध्ये आम्हाला 50 हजार कुटुंबियांना या लाडू मार्फत सुदृढ बनवायचे आहे असे वैवी चे ध्येय आहे.🙏🏻🙏🏻
तर चला मग तुम्हीच व्हा तुमच्या आरोग्याचे सूत्रधार"*
बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही, अशी नेहमी उडवा उडवीची कारण आपण देत असतो... समाजात जेवढे पण यशस्वी लोक आहेत त्यांना जेवढा वेळ मिळतो तेवढाच वेळ आपल्यालाही निसर्गाने दिलेला आहे. मग ही कारण कशासाठी?
जर आपण आपले ध्येय निश्चित केलं तर अशी कारणं द्यायला आपल्याकडे वेळच नसतो, आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम राहणं सोपं जातं... निसर्गाचं घड्याळ आणि पोटाचे घड्याळ हे सारखेच चालते म्हणून त्याप्रमाणे आपण आपला सकस आणि पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे.. प्रत्येक वेळेस आपल्या हातात सहज सर्व भेटलंच असे नाही, कामानिमित्त बाहेर जाणं झालं की खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्या जातात अशा वेळेस काय करावे असा प्रश्न प्रत्येकालाच असतो.
आपल्या कामाच्या वेळेनुसार आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे जर आरोग्य नीट नसेल तर मिळणाऱ्या यशाचे स्वागत आपण करू शकणार नाही किंवा ते आनंदाचे क्षण आपण अनुभवू शकणार नाही यासाठी वेळेचे नियोजन आखून खाण्यापिण्याची पूर्वतयारी असणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही नियोजन करताना ते सुटसुटीत असावं म्हणजे ते पूर्ण करताना कंटाळा येणार नाही.
आता आपण आपला आहार कसा असावा हे पाहूया.
प्रथम अन्नपदार्थाची माहिती करून घ्या त्यानंतर कोणते अन्नघटक कोणत्या अन्नपदार्थ मिळतात याची नोंद घ्या आपल्या आहारात प्रत्येक अन्नघटकांचा बदल करून समावेश असावा. नेहमी चौरस आहार घेण्याकडे लक्ष असावं.
उत्तम चित्रकलेसाठी जसे सात रंग, उत्तम गायकीसाठी सात सूर तसेच उत्तम आरोग्यासाठी सात अन्नघटक-प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स,मिनरल्स, व्हिटामिन्स, पाणी आणि प्राणवायू या सात घटकांचा समावेश असावा. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला आहारात बदल करणे तसेच ऋतूप्रमाणे आहार घेणे, स्थानिक आहार आणि हंगामी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जसे सेंट्रल इंडिया मध्ये शेंगदाणे पिकले जातात म्हणून तेथील लोक शेंगदाण्याचा वापर जास्त करतात, साउथ इंडिया मध्ये नारळ जास्त पीकला जातो म्हणून तेथे नारळाचा वापर जास्त होतो उत्तर भारतात मोहरीचे पीक जास्त पीकले जाते म्हणून तेथील रहिवाशी मोहरीच्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करतात. आपण जिथे राहतो तेथील वातावरणानुसार आपला आहार असावा, आणि निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या प्रत्येक नियमाचे पालन करावे. आपल्या देशात जिल्ह्यात कोणते पीक व्हावे हे निसर्ग ठरवत असतो आणि त्यावर आपलं आहार कसा असावा हे सुद्धा निसर्ग ठरवतो. म्हणून अशाप्रकारे आपणच आपल्या आरोग्याचे सूत्रधार ठरत असतो.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद🙏🏻
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/vaivi.foods
https://www.instagram.com/vaivifoods/
https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ

Great 👍👍
ReplyDeleteKhup chan vaivi
ReplyDeleteKhup chan blog vaivi
ReplyDeleteKhup chan blog vaivi
ReplyDeleteMast information.in depth. Keep writing.
ReplyDeleteWow nice
ReplyDeleteMast
ReplyDeleteVery great information...thank you very much !!!
ReplyDeleteVery informative and motivation to all to maintain a Healthy Diet. Keep it up. AB Distributor organic products whole sale trader.
ReplyDelete